| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
गोखले महाविदयालयात भारतीय अमृत महोत्सवानिमित्त माझी माती माझा देश या अभियानांतर्गत, ‘क्रांतिदिन’ व ‘जागतिक आदिवासी दिन’, या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने, प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थी व स्वयंसेवकांनी आदिवासी वेशभुषा परीधान केल्या होत्या. त्यामुळे आदिम जमातींच्या चाली-रिती व आठवणी जागृत झाल्या.
या वेळी उपप्राचार्य किशोर लहारे यांनी आदिवासी व बीरसा मुंडा आणि स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतीवीरांच्या कार्यावर व्याख्यान देऊन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात समर्पित वीरांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी यांनी क्रांतीवीरांच्या स्मृतींना उजाळा देऊन तरुण पिढीने त्यांचे सतत स्मरण ठेवून वाटचाल करावी असे आवाहन केले. या प्रसंगी प्रा. नवज्योत जावळेकर यांनी विद्यार्थ्यांना सामुहिक पंचप्रण प्रतिज्ञा दिली. प्रा. संतोष लंकेश्वर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास आयक्युएसी प्रमुख डॉ. जोंधळे यांच्यासह सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







