जय श्रीराम नागरी पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार

| आगरदांडा | वार्ताहर |

मुरूड येथील जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुरूड तालुक्यातील इ.10वी व इ.12वीत सर्वप्रथम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व सदस्यांच्या पाल्यांचा प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन श्रीराम पतसंस्थेचे व्हा.चेअरमन प्रा. मेघराज जाधव व राज्य सहकारी संघ पुणे येथील प्रा. एस. बी वटाणे व संचालकांचे हस्ते सत्कार करण्यात आला. दहावी गुणवंतांमध्ये अनिरुद्ध चोरघे, प्रसन्ना महाजन, जिज्ञा रावजी, कौस्तुभ कासार, सानिका पाडगे, रिया शेळके तर इयत्ता 12 वीत क्रिश जैन, सेजल खोत, कोमल पाटील, हर्षाली पाटील तसेच मुरूडमधील वैद्यकीय परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त डॉ. सलोनी पाटील, डॉ. श्रिया पाटील व डॉ. श्रद्धा पटेल तसेच ॲड. महेश्वरी तांबडकर, ॲड. मानसी बैकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Exit mobile version