श्री नामदेव हितवर्धक संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थाचा सत्कार

| महाड | प्रतिनिधी |

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 673 व्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून महाड मधील नामदेव शिंपी समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा समाजाच्या श्री विठ्ठल मंदिराच्या सभागृह आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजन ऊरुणकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा महाडमध्ये 15 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने शहरातील शिंपी समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा आयोजित केला जातो. रविवारी संध्याकाळी नवी पेठ येथील श्री विठ्ठल मंदिराच्या सभागृहामध्ये हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला, याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष विश्‍वनाथ नाझरे, महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ सुप्रिया टमके, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी येथील नामदेव सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दीपक ऊरुणकर, चंद्रकांत पाडाळकर त्याचबरोबर महाड मधील कलाकार पराग बदिरके, माझी अध्यक्ष अनंत टमके, अनंत सुकाळे, डॉ. राहुल सुकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सोहळ्या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन येथील जनकल्याण रक्तपेढी मध्ये करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तीस तरुणांसह दोन महिलांनी रक्तदान केले. उपाध्यक्ष संजय माळवदे यांनी प्रास्तविक केले. महिला मंडळा तर्फे लहान मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास रोडे यांनी केले. तर आभार संस्थेचे अध्यक्ष विश्‍वनाथ नाझरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य नाना पोरे, स्वप्निल मुळे कैलास सलागरे, रितेश वनारसे, कौशिक पोरे, संजय माळवदे, विकास रोडे यांनी विशेष परिश्रम घेतले .

Exit mobile version