मापगावमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे मंगळवारी (दि.11) जून मापगाव येथील धर्मशाळेत ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावतर्फे मापगाव पंचक्रोशीतील 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या 112 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता असलेल्या सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर सोगाव येथील प्रसिद्ध तैलचित्रकार चंद्रकला कदम यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. यावेळी मापगाव पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमामधील 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये साईश सतीश पेडणेकर याने 93% गुण मिळवले, तर रोशनी सूरज घरत हिने 92.80% गुण मिळविले आणि वैष्णवी महेंद्र हुमणे हिने 92.40% मिळविले तसेच सेजल प्रदीप मंडल हिने 91.07% गुण मिळविले याचबरोबर 12 वी मध्ये आर्या मंगेश सोनवणे हिने 90% गुण मिळविले, तर साहिल तारानाथ सुर्वे याने 86.33% गुण मिळविले तसेच मृदुला संतोष घरत हिने 81.66% गुण मिळविले,अशा मापगाव पंचक्रोशीतील एकूण 112 विद्यार्थी व विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र, स्कुल बॅग व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थांना स्कुल बॅग, प्रशस्तीपत्र, पुष्प देण्यात आले.

यावेळी सर्व उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मोरे, प्रसिद्ध तैलचित्रकार चंद्रकला कदम श्री क्लासेसचे चोंढीचे संतोष राऊत यांनी कौतुक करत मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक नाईक, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, अखिल भारतीय हक्क ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय सचिव बाबू थळे, माजी ग्रामपंचायत सदस्य मजीद कूर, मुद्स्सर कुर, गितेश करळकर, अजित घरत, प्रभाकर मोहिते, तेजस काठे, बाबू सोंडे, संतोष रुत, गितेश करळकर, सुनिल अनमाने, दत्ता गुरुजी, संजय राऊत, नागेश राऊत, प्रकाश गुळेकर, लायन विद्या अधिकारी, जान्हवी बारे, जागृती सावंत, शिल्पा अनमाने, सिद्धी क्लासेसच्या घरत, संगिता मल्हार, शफी वाकनिस, दत्तात्रेय राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ पाटील, वजाहत कुर, राकेश करळकर, रुपेश निर्गुण, संतोष घरत यासह अनेक मान्यवर तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनी, पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित हरवडे यांनी केले.

Exit mobile version