गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

। पाली-गोमाशी । वार्ताहर ।

आई सोमजाई माता मंडळाच्यावतीने गोमाशी गावातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दि. 30 जून रोजी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यामध्ये वह्या, पेन, दप्तर यांचा समावेश होता. या मंडळाचा शैक्षणिक साहित्य वाटप आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यामागचा हेतू एवढाच की आपल्या गावातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा. तसेच, इतर विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेरणा घेऊन आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवून आपल्या गावाचे नाव लैकिक करावे.

यावेळी सदानंद गायकवाड, मंगल जाधव, जगदीश सुतार, हरिदास गायकवाड, राजेंद्र खैरे, गजानन जंगम, वीरेंद्र जंगम, श्याम कदम, निलेश खैरे, दीपक दहीबेंकर, संदीप सुतार, राकेश मगर, अशोक गायकवाड, ओमकार जंगम, उमेश मगर, योगेश सुतार तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, महिला, नवतरुणवर्ग, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Exit mobile version