राजेंद्र बोरसे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात जनता विद्यालय लव्हेज शाखेतील सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे राजेंद्र बोरसे यांना अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आ. भरत गोगावले व सामाजिक कार्यकर्ते किशोर धारिया यांच्या हस्ते देण्यात आला. त्यांनी 1998 साली खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सह्याद्री विद्यालय शिळफाटा येथे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरुवात केली. त्यानंतर होनाड येथील पाताळगंगा विद्यालय, तसेच जनता विद्यालय खोपोली व लव्हेज अशी 25 वर्षाच्या सेवेत संस्थेच्या विविध शाखांमधून लोकसहभागातून शाळा विकास क्रीडा विकास असे अनेक विविध राबविले त्यांच्या या 33 वर्षे शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात आल्याचे आविष्कार फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

Exit mobile version