जिल्हाधिकारी किशन जावळे
| रायगड | प्रतिनिधी |
शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार 6 जून व तिथीनुसार 26 जून 2026 रोजी आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याने या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
या बैठकीस युवराजनी संयोगिता राजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके, यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती, दुर्गराज रायगड समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक किल्ले रायगड येथे येत असतात. यावर्षी होणाऱ्या सोहळा कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे.
यावर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, प्रसाधनगृह, परिवहन व्यवस्था तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सूचित केले.
