खा.तटकरे यांची सुचना
| म्हसळा | वार्ताहर |
चुकीच्या पद्धतीने व नदी प्रवाह निर्दोक न ठेवल्यामुळे म्हसळा शहरात पूर नियंत्रण रेषेचा घोळ नव्याने निर्माण झाला आहे. पूर नियंत्रण रेषेमुळे शहरातील 80 टक्के भागातील नागरिकांना याचा फटका बसणार आहे.यासाठी तात्काळ पूर नियंत्रण रेषेची पुनः मोजणी करण्याचे आदेश खा. सुनिल तटकरे यांनी जलसंपदा विभागाला दिले. वीस हजार लोकसंख्या असणाऱ्या म्हसळा शहराच्या एका बाजूने उतार असणाऱ्या भागातून जाणसई नदी वाहत आहे. या नदीमुळे अद्याप म्हसळा शहरात पूर येऊन जीवित हानी व मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद नाही. मात्र पूर नियंत्रण रेषा शहरातील भारत पेट्रोल पम्प, म्हसळा बौद्धवाडी लगत, उमर फारूक मोहल्ला, काझी मोहल्ला पूर्ण, दिघी रोड परिसर पूर्ण, म्हसळा बस स्थानक व अंजुमन शाळा या भागातून गेली असल्याची नोंद करण्यात आली आहे. पूर नियंत्रण रेषा ज्या भागातून गेली आहे त्या भागातील नागरिकांना भविष्यात कोणतेही विकासकामे करता येणार नाही.
जमिनीच्या खरेदी विक्रीवर याचे परिणाम होऊन अनेक शासकीय समस्या उदभवतील.मात्र अशा समस्या येऊ नये म्हणून पूर नियंत्रण रेषेची नोंद रद्द करून द्यावी असे निवेदन म्हसळा शहरातील व्यापारी व नागरिकांनी रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांना भेटून दिले.यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना फोन लावून तात्काळ पूर नियंत्रण रेषेची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश दिले.
यावेळी नाजीम हसवारे, नगराध्यक्ष असहल कादिरी, संजय कर्णिक,उ शाहिद उकये, रियाझ घराडे, रफी घरटकर, शकूर घनसार, सलाम हळदे, युनिस मेमनं, प्रकाश करडे,डॉक्टर नसीम खान, नगरसेवक सुनिल शेडगे, नासीर मिठागरे, निकेश कोकचा,शाहिद जंजिरकर, शोएब हळदे, इकबाल भंगार वाला,खालिद काझी, नदीम दळवी, रवी जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
पूरप्रवण क्षेत्रातील निळी,लाल रेषा
नदीच्या पूरप्रवण क्षेत्राच्या अनुषंगाने मनिळीफ आणि मलालफ रेषा निश्चित करून पुराच्या दृष्टीने नागरी वस्त्या आणि बांधकामासाठी निषिद्ध क्षेत्र घोषित केलेले असते. पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूर रेषेच्या आत कोणतेही बांधकाम न होण्याच्या दृष्टीने पूर रेषेची आखणी करणे. यासोबतच निषिद्ध आणि नियंत्रित क्षेत्राचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने जारी केल्या आहेत. यात मनिळी रेषाफ घोषित केलेल्या भागात निवासी आणि रहीवासासाठी कोणत्याही परवानगीला स्पष्टपणे निषिद्ध ठरविल्या गेलं आहे.