म्हसळा नाभिक समाज संघटनेची कार्यकारणी जाहीर

| म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुका नाभिक समाजाची सभा नुकतीच तालुक्याचे मावळते अध्यक्ष प्रदिप महादेव कदम यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. त्यामध्ये पुढील तीन वर्षासाठी म्हसळा तालुका नाभिक समाज अध्यक्ष पदी हिंदू ग्रामस्थ मंडळाचे विद्यमान सचिव सुशील यादव यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष रुपेश पवार, सचिव दीपल शिर्के,सहसचिव विजय बडे, खजिनदार अमोल कदम, कार्याध्यक्ष सुनिल भोसले.यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ समाज बांधव महादेव कदम, दिलीप शिर्के, बुरुणकर, विजय बडे, सदाशिव साळुंखे, घनश्याम कदम, अनंत शिंदे, अनंत पवार, निलेश भोसले, साहिल कदम, मंगेश कदम, वैभव जाधव, संदिप जाधव, महेश खराडे,प्रथमेशप्रदिप कदम, प्रशांत चव्हाण आदि मान्यवर समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version