तहसीलदार समीर घारे यांचे प्रतिपादन
| म्हसळा | वार्ताहर |
आजच्या संगणक युगात कॉम्पुटरचे परिपूर्ण ज्ञान असणे अत्यावश्यक असून, ज्याच्याजवळ परिपूर्ण ज्ञान असेल त्याचाच निभाव लागू शकतो, तेव्हा बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळेल असेच शिक्षण आत्मसात झाले पाहिजे किंबहुना ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन तहसीलदार समीर घारे यांनी केले. म्हसळा शहरातील आयकॉन कॉम्प्युटर सेंटरचे उद्घाटन तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, मुस्लिम समाज अध्यक्ष नाजीम चोगले, डॉ. सालेह राऊत, माजी सभापती छाया म्हात्रे, प्रा. दिगंबर टेकळे, अंजुमनचे प्रा. मोहंमद तांबे, प्रा. मुबशीर जमादार, तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेव पाटील, अनंत येलवे, ईमरान फकिह, नसिर मिठागरे, बाबू शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंकदर अकलेकर यांनी, सूत्रसंचालन हणमंत मोरे यांनी, तर आभार प्रदर्शन जल्पा शहा यांनी केले.