| म्हसळा | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा म्हसळा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम सोमवारी(दि.19) कन्याशाळेच्या भव्य प्रांगणात संपन्न झाला. पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, नंदू गोविलकर, जयश्री कापरे, राखी करंबे, सरोज म्हशीलकर, सुफियान हलडे, बाबू शिर्के, समिधा वेदक, समीर बनकर, सुशील यादव, संतोष उद्धरकर, सुमित्रा खेडेकर, मयूर बनकर, महेश पवार, केंद्र प्रमुख किशोर मोहिते, दिलीप शिंदे, इंदिरा चौधरी, अरुण माळी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य आणि बंजारा नृत्य सादर केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राम रहाटे यांनी केले.







