| कर्जत | वार्ताहर |
कर्जत एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या, कर्जत व कडाव या इंग्रजी माध्यमाच्याशाळांमधे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे पदाधीकारी प्रविण गांगल, सतीश पिंपरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थीत होते. शाळेचे पर्यवेक्षक सुनील बोरसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारुढ मूर्ती भेट दिली. या मूर्तीचे पूजन संस्थेचे पदाधीकारी, शिक्षक वर्ग यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्यातील अनेक गुण वैशिष्ट्यांचे प्रदर्शन मुलांनी साकारलेल्या चित्रकला, नाच, गाणी, पोवाडे अशा स्वरुपात प्रदर्शित केले. यावेळी महाराजांच्या मधील प्रभावी संघटक, उत्कृष्ट प्रशासक, रणनीतीज्ञ, कर्तव्यनिष्ठ, व्यवहार कुशलता, अज्ञाधारक पुत्र या व अशा अनेक अलौकिक गुणांचे स्मरण व प्रकटीकरण विद्यार्थी वर्गाने केले.