जयंत पाटलांच्या निलंबनाविरोधात म्हसळ्यात पडसाद

| म्हसळा | वार्ताहर |
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. हे नियमबाह्य असून, हा सत्तेचा गैरवापर असल्याने म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्ष अशल कादीरी, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, माजी नगराध्यक्ष कविता बोरकर, महिला अध्यक्षा सोनल घोले, शहर अध्यक्ष रियाज घराडे, गटनेते संजय कर्णिक, भाई बोरकर, माजी सभापती छाया म्हात्रे, अंकुश खडस, सुहेल हलडे, महेश घोले, लहू म्हात्रे, प्रकाश गाणेकर, सुरेश महाडिक, उपनगराध्यक्ष सुनील शेडगे, फवाद उकये, माजी उपसभापती संदीप चाचले आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version