म्हसळा – कला शाखेतून साक्षी अंजर्लेकर प्रथम

| म्हसळा । वार्ताहर ।
न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळाचा एकूण निकाल 98.28 टक्के लागला असून याही वर्षी मुलींनीच बाजी मारल्याचे निकालावरून स्पष्ट होते. यामध्ये वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक पायल अविनाश बोरकर 74.83 टक्के, दुसरा क्रमांक धनश्री चंद्रकांत मेंदडकर 70.17 टक्के, तिसरा क्रमांक माधवी वामन कांबळे 70टक्के त्याच प्रमाणे कला शाखेतून प्रथम क्रमांक साक्षी सुनिल अंजर्लेकर 65.33 टक्के, दुसरा क्रमांक ऋतू सुभाष कदम 61.83 टक्के, तर तिसरा क्रमांक विभागून शुभम प्रभाकर भेकरे 60.33 टक्के, रोहन शंकर खेरटकर 60.33 टक्के यांनी पटकविला असून मागास वर्गीयांमध्ये प्रथम क्रमांक शिवानी श्रीनाथ वर्मा 67.33 टक्के, दुसरा क्रमांक अरविंद रविंद्र येलवे 65.67 टक्के, तर तिसरा क्रमांकाचा मानकरी ठरली वैदही विजय मोरे 63.33 टक्के गुण संपादित केले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक मिलिंद हिवाळे, गटविकास अधिकारी, स्कूल चेअरमन समीर बनकर, जि. प. चे माजी कृषी सभापती बबन मनवे, प्रा.प्रकाश हाके, नगराध्यक्ष असल कादिरी, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, नगर सेवक संजय कर्णिक नगरसेविका राखी अजय करंबे, प्राध्यापक चव्हाण आदि मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version