| वाघ्रण | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सातघर गावचे ज्येष्ठ नागरीक आणि रायगड जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त शिक्षण विभागाचे अधिकारी रामकृष्ण म्हात्रे यांचे रविवारी (दि.7) निधन झाले. शेकापच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्त्या आणि सोशल मिडीयाच्या सेलच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी रविवारी (दि.14) म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. चित्रलेखा पाटील यांनी रामकृष्ण म्हात्रे यांच्या पत्नी कवीता म्हात्रे, मुलगा प्रतिक म्हात्रे, सुन पूजा म्हात्रे व नात यांच्यासह नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी शेकापचे तालुका शेतकरी समिती अध्यक्ष अनिल पाटील, पेढांबे ग्रामपंचायत सदस्य कैलास म्हात्रे, रुपेश पाटील, अनिल पाटील, धनंजय पाटील, प्रकाश पाटील आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.







