| अलिबाग | प्रतिनिधी |
नुकतीच उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्कर्ष’ या सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील काव्यवाचन व वक्तृत्व स्पर्धांसाठी अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद घाडगे यांची निवड करण्यात आली होती.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांकडून विविध कला गुणांमध्ये पारंगत असलेले मोजके विद्यार्थी ‘उत्कर्ष’ या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरत असतात. शैक्षणिक वर्ष 2025-26 चा राज्यस्तरीय उत्कर्ष सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. ‘उत्कर्ष’साठी विविध स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी राज्यातील अनेक दिग्गजांना परीक्षक म्हणून आमंत्रित केले होते. त्यामध्ये वेश्वी-अलिबाग येथील पीएनपी महाविद्यालयाचे प्रा. मिलिंद घाडगे यांचा समावेश होता. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रकाश महानवर, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांच्यासह पीएनपी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, प्रा. डॉ. ओमकार पोटे, कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गिते तसेच सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी प्रा. मिलिंद घाडगे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
