जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि 11 लाख 73 हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी चार अनोळखी व्यक्तींविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल चार्ल्स हे नावडे फेस टू तळोजा येथे राहतात. त्यांना फेसबुकवर सोशल नेटवर्किंग शेअर मार्केट संबंधित कलेक्टिव्ह ट्रेनिंग बाबत जाहिरात दिसली. त्यांनी त्या नंबरवर संपर्क केला. यावेळी त्यांना समोरील व्यक्तीने अ‍ॅप बाबत माहिती दिली आणि अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. गुंतवणूक केलेले रकमेवर 60 ते 90 टक्के नफा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. त्यांनी पाच हजार रुपये भरून शेअर्स घेतले. एका आठवड्यात त्यांना भरलेली रक्कम दुप्पट झाल्याचे दिसले. त्यानंतर दुसर्‍या व्यक्तीने 2 लाख 31 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी पैसे ट्रान्सफर केले. त्यात त्यांना तोटा झाल्याने तो तोटा भरून काढण्यासाठी काही शेअर्स खरेदी करावे लागेल असे सांगून 1 लाख 75 हजार रुपये भरण्यास सांगितले. असे एकूण 11 लाख 73 हजार रुपये त्यांनी भरले. भरलेले पैसे परत मागितले असता पैसे मिळणार नाहीत असे सांगण्यात आले. 

Exit mobile version