। पनवेल । वार्ताहर ।
आपण डीआरआय वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून काही जणांना नोकरीला लावतो अशी बतावणी करून त्यांच्या कडून जवळपास 16 लाख 44 हजार 499 रुपयांची फसवणूक केल्याची घटना पनवेल शहरात घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. करण पदमा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय निंबाळकर हे डीआरआय मध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे खोटे सांगून त्याने करण पदमा यांच्यासह इतर अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्या कडून 16 लाख 44 हजार ४९९ रुपये घेऊन त्यांना नोकरीला न लावता तसेच घेतलेले पैशे परत न करता फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







