पिण्याच्या पाण्यासाठी ‘मिनरल वॉटर’चा आधार

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील दीड लाख लोकसंख्येच्या 26 ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी पुरविणार्‍या रानसई धरणाची पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा कमी असल्याने उरण तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपणार आहे. त्याशिवाय पाणीटंचाईची झळ नागरिकांबरोबरचे सोहळे, लग्नसराईलाही बसल्याने नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी महागड्या मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमधील गावांना रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, फेब्रुवारी,-एप्रिल महिन्यापासूनच तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. करंजा गावातील नागरिकांना पाण्यासाठी 12 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागते. सुमारे 12 हजार लोकसंख्या असलेल्या केगाव ग्रामपंचायतीतील गावांनाहीपाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच चिरनेर, रानसईतील अनेक आदिवासी वाड्याही तहानलेल्या आहेत. याआधी दोन दिवसांआड मिळणारे पाणी आता 8-10 दिवसांनंतरही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीटंचाईमुळे गृहिणींच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाणीटंचाईमुळे कर्ज काढून अनेकांनी बोअरवेलचा खर्चिक पर्याय निवडला आहे. मात्र, अनेक बोअरधारक बोअरवेलचे पिण्यालायक नसल्याने पाणी तहान भागविण्यासाठी मिनरल वॉटरचा वापर करू लागले आहेत. मिनरल वाटरच्या एक लिटर्स बॉटलसाठी 10 ते 20 तर 20 लिटर्सच्या प्लास्टिक बॉटलसाठी 55 ते 60 रुपये अतिरिक्त खर्च करण्याची वेळ पाणीटंचाईग्रस्त गावातील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. टंचाईग्रस्त ग्रामपंचायती आणि एमआयडीसी मात्र परस्परांकडे बोटे दाखवून वेळ मारून नेत आहेत. याबाबत मात्र एमआयडीसीचे उप अभियंता रवींद्र चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पाणीटचाईमुळे लग्नसराई, सोहळे आणि इतर समारंभासाठी आयोजक, वधुवर पित्यावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. उपस्थितीत साजरे होणार्‍या समारंभासाठी आखण्याचे प्रयत्न सुरू खर्चात अतिरिक्त 10 ते 20 हजारांनी वाढ आहेत. झाली असल्याचे आयोजक, तसेच वधुवर पित्याकडून सांगितले जात आहे.

-नीलम गाडे


Exit mobile version