। कर्जत । वार्ताहर ।
जागतिक पर्यटन स्थळ असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. या माथेरानमध्ये जाण्यासाठी निघालेली मिनी बस घाटात बंद पडल्याने ऐन उन्हाळ्यात प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गुरूवारी (दि.18) कर्जतहून सकाळी सव्वाआठच्या सुमारास 40 प्रवाशांना घेऊन निघालेली मिनी बस जम्मापट्टीजवळ तीव्र चढाव असल्याने गरम होऊन घाटात बंद पडली. त्यामुळे बसमधून नेहमी प्रवास करणार्या प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पर्याय म्हणून दुसरी बस मागवण्यात आली, पण प्रवाश्यांनी थांबून न राहता मिळेल त्या वाहनाने माथेरान गाठले. तर, प्रवाशांचे तिकीटाचे पैसै परत न दिल्या मुळे संताप व्यक्त करण्यात आला.
सध्या नेरळ माथेरान घाटात सुरू असलेल्या बस जीर्ण झाल्या असून त्यातून प्रवास करणे म्हणजे साक्षात यम राजाला आंमत्रित करण्यासारखे आहे. त्यामुळे प्रवांशाची सुरक्षा रामभरोसे आहे. एखादा मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही दिवासांपुर्वी माथेरान घाटात नवीन बसची चाचणी घेण्यात आली. परंतु, ती आकाराने मोठी असल्याने घाटातील वळणावर अडचण येऊ लागली. त्यांनंतर नवीन बस देण्यात येतील, अशी घोषणा कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली होती. पण, अद्याप बस माथेरानला येऊ शकली नाही. त्यामुळे जुन्याच बसमधून जिव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. तर, माथेरानच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत या सातत्याने शासन दरबारी नवीन मिनीबस करता पाठपुरावा करत आहेत, परंतु त्यांच्याही प्रयत्नांना यक्ष आले नाही. शासन लोकांचे जिव जायची वाट पहात आहे का, असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.