मिनी ट्रेनचा प्रवास गारेगार

वातानुकूलित सलून कोचची जोडणी
। माथेरान । वार्ताहर ।
नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा प्रवासही आता वातानुकूलित होणार आहे. मिनी ट्रेनला वातानुकूलित एक विशेष सलून (आरामदायक डबा ) डबा जोडण्याचा मध्य रेल्वेने घेतला आहे. हा वातानुकूलित डबा हा एकूण आठ आसनी असून नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी त्याचप्रमाणे पूर्वनोंदणी करून रात्रीच्या मुक्कामासाठी उपलब्ध असणार आहे. पर्यटक एकूण भाड्याच्या 20 टक्के आगाऊ रक्कम भरून प्रवासाच्या तारखेच्या सात दिवस अगोदर 10 हजार रुपये सुरक्षा ठेवीसह वातानुकूलित सलून बुक शकतात. उर्वरित 80 टक्के प्रवासाच्या तारखेच्या 48 तास अगोदर रक्कम भरावी लागेल असे न केल्यास आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल आणि बुकिंग रद्द झाले असे मानले जाणार आहे. 48 तासांच्या आत बुकिंग रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही.

दर पत्रक
रात्रभर मुक्कामासह राउंड :- आठवड्यातील दिवशी 32 हजार 88 रुपये करांसहीत आणि त्याव्यतिरिक्त दीड हजार रुपये प्रति तास
आठवड्याअखेरीस ( वीकेंडला) रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी 44 हजार 608 रुपये करांसह आणि अन्य शुल्कासह 1,800 रुपये प्रति तास आकारले जातील.

मिनी ट्रेनची वेळ
नेरळ ते माथेरान सेवा
ट्रिप ए :- नेरळहून 08.50 वाजता सुटेल आणि माथेरानला सकाळी 11.30 वाजता पोहोचेल.
ट्रिप बी :- नेरळहून सकाळी 10.25 वाजता सुटेल आणि माथेरानला दुपारी 01.05 वाजता पोहोचेल.

माथेरान ते नेरळ
ट्रिप सी :- माथेरानमधून 02.45 वाजता सुटून नेरळला दुपारी 04.30 वाजता पोहोचेल
ट्रिप डी :- माथेरानमधून दुपारी 04.00 सुटून नेरळला सायंकाळी 06.40 वा.

Exit mobile version