पनवेलमधून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील वलप-साईनगर परिसरातून 12 वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलप येथील किरणदेवी वर्मा या बाथरूमसाठी गेल्या असताना त्यांचा मुलगा युवराज वर्मा (12) याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. युवराज रंगाने सावळा, सडपातळ बांधा, उंची सुमारे 4 फूट, काळे केस व काळे डोळे असे असून, तो लाल रंगाचा टी-शर्ट आणि हिरव्या रंगाची हाफ चड्डी परिधान करून घराबाहेर पडला आहे. विशेष म्हणजे, संबंधित मुलगा यापूर्वीही सुमारे पाच-सहा महिन्यांपूर्वी तसेच दोन वर्षांपूर्वी घरातून निघून गेला होता आणि त्यानंतर स्वतःहून घरी परतला होता, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

Exit mobile version