धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे एकाच दिवशी दोन विवाह

काझीसह 22 जणांवर गुन्हा दाखल

। बीड । प्रतिनिधी ।

बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे एकाच दिवशी दोनवेळा विवाह करण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काझीसह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे.

हा धक्कादायक प्रकार शाहू नगर परिसरात घडला. घटनेतील पीडित अल्पवयीन मुलाचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले असून तिचा एकाच दिवशी दोन वेळा विवाह लावून देण्यात आला. गुरुवारी (दि. 12) याबाबत माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिळाली होती. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी जाऊन पीडितेची सुटका केली. तसेच, याप्रकरणी काझीसह 22 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी मुलीची चौकशी केली असता तिचा एका 32 वर्षीय इसमाबरोबर विवाह लावून देण्यात आला होता. मात्र, याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने तो पळून गेला. त्यानंतर तात्काळ तिचा दुसऱ्याबरोबर विवाह करण्यात आला. लग्न लावल्यानंतर सर्व जण पळून जात होते. मात्र, पोलिसांनी रस्त्यावर त्यांची गाडी अडवून त्यांना ताब्यात घेतले.

Exit mobile version