रसायनी येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

। रसायनी । प्रतिनिधी ।

रसायनीतील कांबे गावातील अल्पवयीन मुलगी तेजस्विनी हनुमंत कासले (15) हिला तिच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने तिस फुस लावून पळून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत तिची आई नागिनबाई कासले (45) यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तेजस्विनी ही रंगाने सावळी, उंची 4 फुट 5 इंच, अंगाने सडपातळ, नेसून ब्राऊन रंगाचा टाॅप, निळ्या रंगाची जिन्स, पायात सॅण्डल, सोबत स्कुल बॅग असे तिचे वर्णन आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव मो- 9028361122 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन रसायनी पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version