| रसायनी | प्रतिनिधी |
मोहोपाडा येथे राहणाऱ्या बारा वर्ष वयाच्या दोन मुलींचे अपहरण झाले असून, पालकांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेबी रोड मोहपाडा येथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली मोहोपाडा बाजारपेठ येथे गेल्या होत्या. परंतु, त्या उशिरा पर्यंत घरी परत न आल्याने पालकांनी नातेवाईक, मित्र मंडळींकडे सर्वत्र शोध घेतला. परंतु, काही एक ठावठिकाणा मिळला नाही. त्या अल्पवयीन आहेत या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांस फुस लावून अज्ञात व्यक्तीने त्यांना पळवून नेल्याची तक्रार रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.






