संतापजनक! रोह्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

| रोहा | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली. वरसे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा विनयभंगाच्या घटनेमुळे रोह्यात खळबळ उडाली आहे. सुलतान पानसरे असे आरोपीचे नाव असून, त्याला रोहा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे सिद्धार्थनगर धावीर रोड येथे रेशन धान्य विक्रीचे दुकान आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनसुद्धा तिला आधार कार्ड लिंक करण्याचे कारणाने दुकानात बोलावून मोबाईलमधून अश्‍लील रिल्स दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शरीला स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. याबाबत पीडितेची आई सुलतान यास जाब विचारण्यास गेली असता, तिलाही त्याने धमकी दिली. या घटनेची तक्रार पीडिता व तिच्या आईने रोहा पोलिसांना देताच, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version