| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठेत सकाळी फेरफटका मारणाऱ्या अल्पवयीन मुलीची स्कूटीवरून आलेल्या तीन अनोळखी तरुणांनी सोनसाखळी लुटल्याची घटना घडली आहे. कामोठे उपनगरातील सेक्टर 25 येथील जेएनपीटी ते कळंबोली सर्कलला जोडणाऱ्या सेवा रस्त्यावर हा प्रकार घडला. तीन युवकांनी स्कूटीवरून पहाटेच्या वेळी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला थांबवले. मुलीला जबरदस्तीने अडवून तिच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. यावेळी मुलीच्या मानेला जबर जखम झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







