अल्पवयीन मुलीसोबत रिक्षाचालकाचे गैरवर्तन

| डोंबिवली | वृत्तसंस्था |

कल्याणमध्ये शिकवणीवरुन घरी जाताना अल्पवयीन मुलीसोबत रिक्षामध्ये चालकाने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने धावत्या रिक्षातून उडी घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.9) रोजी घडली आहे. यानंतर रिक्षाचालकाने मुलीचा पाठलाग करत तिला अश्लील शिवीगाळ केला. संशयित आरोपी गोपाळ मुदलियार असे मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या घटनेनंतर मुलीने घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. यानंतर पालकांनी तात्काळ कोळसेवाडी पोलिस स्थानक गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, संशयित आरोपी गोपाळ मुदलियार या रिक्षावाल्याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास कोळसेवाडी पोलिस करत आहेत.

Exit mobile version