पेण राष्ट्रवादीकडून गर्दी जमविण्यासाठी आशाताई, अंगणवाडी सेविकांची दिशाभूल

सत्काराच्या नावाखाली पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थितीची सक्ती
| पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष म्हणजे नेतेमंडळी ढीगभर तर कार्यकर्ते मूठभर. पेण तालुक्यात प्रत्येक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा पदाधिकारी आहे. त्यामुळे कार्यक्रम करायचा तर व्यासपीठासमोर बसायला कार्यकर्तेच नसतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीने आयडीयाची कल्पना लावून चुकीच्या पद्धतीने आशा ताई व अंगणवाडी सेविकांना पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती केली. कोव्हिड काळातील कार्याची दखल घेत आपला सत्कार करायचा असल्याचे सांगत त्यांची फसवणूक करीत कार्यक्रमस्थळी ऐन दिवाळीच्या सणात दिवसभर ताटकळत बसवून ठेवले. दोन दिवसांपूर्वी ओढांगीच्या एका कार्यक्रमाला गर्दी काही होणार नाही, त्यामुळे कार्यकर्तीने चुकीच्या पद्धतीने आशा ताई व अंगणवाडी सेविकांना कोव्हिडमध्ये आपण काम केलेय म्हणून आपल सत्कार करायच आहे असे सांगून म्हणजेच फसवून कार्यक्रम ठिकाणी सकाळी 10.30 वाजता बोलवले. बिचारे आशा ताई व अंगणवाडी ताई या दिवाळीची तयारी न करता आपला सत्कार होणार आहे, या आशेने दहा वाजताच कार्यक्रम स्थळी पोहोचल्या. मात्र, ज्यांना गर्दी दाखवण्यासाठी ही सर्व खटाटोप केला होता, त्या प्रमुख अतिथी पालकमंत्री अदिती तटकरे या कार्यक्रम स्थळी दोन वाजता पोहोचल्या. व्यासपीठावर नेते मंडळी दिसत होते, मात्र व्यासपीठाच्या खाली कार्यक्रमाला जी मंडळी जमवली होती, ती म्हणजे आपला प्रामाणिक काम करणार्‍या आशा ताई व अंगणवाडी ताईच होत्या. ज्या सत्काराच्या आशेने या महिला आल्या होत्या, त्यांच्या अक्षरश तोंडाला पाने पुसली. सत्कार राहिला बाजूला, सत्काराच्या नावाने या महिलांच्या भावनांशी खेळले गेले. आशा ताई व अंगणवाडी मदतनीसचा तर विचारच झाला नाही. 10 वाजता आलेल्या या महिला भगिनींना चार वाजता मोकळे केले. एवढया वेळात एक वडापाव देण्यात आला. ही बाब एका राजकीय पक्षाच्या कार्यकत्यांना न शोभणारी आहे, हेही तेवढेच सत्य आहे. त्यामुळे कार्यक्रम राष्ट्रवादीचा अन्नाविना हाल झाले ते मात्र अंगणवाडी ताई, आशा ताई व अंगणवाडी मदतनीसचे. यापुढे तरी राष्ट्रवादीच्या पक्ष श्रेष्ठीने आपल्या स्थानिक नेत्यांना सजक सूचनाच दयाव्यात की अशा प्रकारे आरोग्याची काळजी घेणार्‍या या महिला भगिनींच्या भावनांशी खेळू नये, एवढीच माफक इच्छा.

महिला नेत्याची तंबी
अंगणवाडी सेविकांना वस्तू दिल्या त्यामध्ये बादली, मघ आणि चादर या वस्तूदेखील त्यांना न देता अंगणवाडीमध्ये ठेवून घ्या, अशी तंबी राष्ट्रवादीच्या स्थानिक महिला नेत्यांनी या अंगणवाडी ताईंना दिली. या तीन वस्तूंच्या सोबत पारलेजीचे 5-5 रुपयेवाले चार पुडे देण्यात आले. अशा प्रकारची वागणूक देऊन आरोग्याची व कुटुंबाची खर्‍या अर्थाने काळजी घेणार्‍या आशा ताईचा व अंगणवाडी ताईंचा अपमानच केला.

Exit mobile version