| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत 88.36 मीटर भालाफेक करत चांगली सुरूवात केली. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या जेकब वडेलिच 88.38 मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले. नीरजचे अव्वल स्थान अवघ्या 2 सेंटीमीटरने हुकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने गोल्ड मेडल मिळवले होते. मात्र, दोहा डायमंड लीगमध्ये जेकब वडेलिचने नीरजला मागे टाकले.
नीरज जरी दोहा डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर असला तरी नीरजने आपला बेस्ट थ्रो दिला. त्याने 88.36 मीटर भालाफेक करत आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले. नीरजसोबत सहभागी झालेला भारताचा किशोर जेना हा दुसरा भालाफेकपटू 10 पैकी नवव्या स्थानावर राहिला. त्याने 76.31 मीटर लांब भाला फेकला. तो पहिल्या तीन थ्रोनंतर इलिमिनेट झाला. नीरज चोप्रा गेल्या काही हंगामापासून 90 मीटरचा मार्क पार करण्यासाठी जोर लावत आहे. मात्र दोहा डायमंड लीगमध्ये तो अवघ्या काही मीटरच्या अंतराने 90 मीटर मार्क पार करण्यापासून हुकला.