आईसह मुले बेपत्ता

पनवेल | वार्ताहर |
आईसह दोन मुले बेपत्ता झाल्याची घटना पनवेल शहरात घडली असून, याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जैबुनीसा नुरद्दीन सयद नालबंद (30 रा.कच्छी मोहल्ला, पनवेल), उंची 155 सेमी, बांधा मध्यम, रंग गोरा, केस लांब, चेहरा गोल, नाक सरळ असून अंगात पंजाबी ड्रेस, सोबत मोबाईल फोन आहे. त्याचबरोबर मुलगा शोएब उंची 160 सेमी बांधा सडपातळ, रंग सावळा, केस बारीक, चेहरा गोल, नाक सरळ असून अंगात पॅन्ट व शर्ट आहे. तर मुलगी सबा उंची 145 सेमी, बांधा मध्यम, रंग सावळा, केस आखूड, चेहरा उभट, नाक सरळ लहान असून, अंगात जिन्स पॅन्ट व टी-शर्ट घातले आहे. ते तिघेही राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. यांच्याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा पो.हवा. एस.एम. थोरात मोबा नं. 8898958540 येथे संपर्क साधावा.

Exit mobile version