मांजुर्णे येथील महिला बेपत्ता

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुक्यातील मांजुर्णे गावातील 30 वर्षीय महिला राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि.16) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. योगिता परेश कुर्णे असे बेपत्ता मुलीचे नाव आहे.

योगीता रंगाने सावली, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, डोळे काळे, उंची सुमारे 155 सेमी, अंगात पिवळ्या रंगाचा कुर्ता, हिरव्या रंगाचा पायजमा, पायात काळ्या रंगाची चप्पल असे वर्णन आहे. संबंधित महिला कोणाला आढळल्यास तापसिक अंमलदार पोलीस हवालदार तुणतुणे मो.नं. 7498324190 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन माणगाव पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version