मिशन कवच कुंडल कार्यक्रम यशस्वी

। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासनातर्फे लसीकरणाची विशेष मोहीम सुरू केली असून नवरात्री निमित्ताने महिलांना कोविड लस देण्यासाठी कवच-कुंडल अभियान राबविले आहे. मिशन कवच-कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कोव्हिड महामारीच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता ही लाट येण्या आधीच मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले पाहिजे या दृष्टीकोनातून शासनातर्फे विशेष लसीकरण मोहीम राबविली आहे. या मोहिमेत समाजातील महिलांसाठी नवरात्री निमित्ताने विशेष कवच-कुंडल नावाने विशेष अभियान सुरू केले. मिशन कवच कुडल अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उलवे, प्राथमिक आरोग्य केंद्र वावंजे पनवेल मार्फत चिन्द्रन गामपंचायत येथे रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी व पंचायत समिती सदस्या वैशाली देशेकर, सरपंच कमला देशेकर,डॉ राज चव्हाण वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
नारपोली प्रा.आ.कें.आजीवली तालुका पनवेल येथे मीशन कवचकुंडल अंतर्गत विशेष महीला कोवीड लसीकरण सत्राला जिल्हा आरोग्य अधिकारी यानी भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे, जांभिवली व नानोशी येथे महिला लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. उपकेंद्र दापोली, माणघर,मोसारे,नानोशी, पाटणोली, गराडा बेलवाडी येथे विशेष कोव्हिड लसीकरण मोहीम महिलांसाठी राबविल्यामुळे जास्तीत जास्त महिलांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्या समवेत आरोग्यसेवक श्री.पाटील, आरोग्य सेविका श्रीम वायरे, ग्रामसेविका, अशा स्वयंसेविका मदतनीस, यांच्या उपस्थितीत हे अभियान सुरू आहे.

Exit mobile version