अलिबाग । वार्ताहार ।
अलिबाग तालुक्यातील पर्यटन स्पॉट असलेल्या नागाव गावात ग्रामपंचायतीतर्फे विशेष मोहीम म्हणजेच मिशन कवच कुंडल अशी 100% कोव्हिड लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
नागाव गावात दि.14 आणि 18 ऑक्टोबर रोजी ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. मिशन कवच कुंडल अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत नागाव व आरोग्य उपकेंद्र यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उर्वरित नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सिद्धिविनायक मंदिर ते नागाव हायस्कूल तसेच नागाव बंदर असे लसीकरणाचे स्वरूप होेते. आत्तापर्यंत एकूण 102 ग्रामस्थांना घरोघरी जाऊन लस देण्यात आली. नागाव गाव हा पुर्णपणे कोरोनामुक्त करू असे आश्वासन गावचे सरपंच निखिल मयेकर यांनी यावेळी दिले.