हेल्पलाईन नंबरचा गैरवापर, पोलीसांना मुद्दाम धावडवले

| सिंधुदुर्ग | वृत्तसंस्था |

महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांनी हेल्पलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा महिलांनाही होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. या हेल्पलाईनवर मदतीसाठी फोन आल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचतात. शिवाय महिलांची सुरक्षित सोडवणूकही करतात. असाच एक फोन कुडाळ पोलिसांना आला होता. त्यामुळे पोलिस घटनास्थळी तातडीने रवाना झाले. पण ज्यावेळी ते घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांना, त्या फोन मागील सत्य समजले. त्यावेळी पोलिसही हबकून गेले.

कुडाळ पोलिसांना एक फोन आला होता. हा फोन 112 या हेल्पलाईन क्रमांकावर गेला होता. एक मुलीवर कुडाळ जवळ महामार्गावर अत्याचार सुरू आहेत. तिला मदतीची गरज आहे. असे फोन वरून सांगण्यात आले. त्यानंतर फोन ठेवण्यात आला. फोन ऐकून पोलिसांची धावपळ उडाली. तातडीने सांगितलेल्या ठिकाणी पोलिस पोहोचले. पण तिथे असला काही प्रकार सुरू नव्हता. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. हे कोणी आणि का केले असावे असा प्रश्‍न पोलिसांना पडला. त्याचा शोध पोलिसांनी घेतला. गुन्हे रोखले जावे यासाठी हा हेल्पलाईन नंबर आहे. पण त्याचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मुंबई गोवा महामार्गावरील एका हॉटेल जवळ विनम्र मोरे आणि नंदिता मोरे हे दोघे मुंबईला जाण्यासाठी उभे होते. त्यांच्या गाडीला येण्यासाठी उशिर होणार होता. त्यामुळे फावल्या वेळात काही तरी मज्जा करूया असे त्यांना सुचले. त्यातून त्यांनी एक आयडिया केली. त्यांनी थेट 112 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला. त्यावरून एक मुलगा एका मुलीवर जबरदस्ती करत आहे असे सांगितले. त्यानंतर पोलिस त्यांनी सांगितलेल्या ठिकाणावर गेले. पण तिथे असं काही नव्हतं.

हा फोन केल्यानंतर त्या दोघांनी त्यांचा फोन बंद केला. पण आपली फसवणूक झाली आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी ज्या फोन वरून हेल्पलाईनला फोन आला होता त्याची पडताळणी केली. त्यावरू ते दोघे त्या बस स्थानकात होते. तिथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर आपण केवळ मज्जा म्हणून हा फोन केल्याचे या दोघांनीही कबूल केले. मज्जा करणं या दोघांच्याही अंगाशी आले. मजा करण्याची सजा त्यांना मिळाली. त्यांच्या विरोधात पोलिसांची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version