| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्यातून एक संशयास्पद टँकर जप्त करण्यात आला आहे. स्फोटक आरडीएक्स टँकरमधून गोव्यात नेत असल्याची फोन मुंबई कंट्रोल रुमला आला होता. त्यातनंतर पोविसांनी रायगड तसेच रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधून तातडीने नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. सर्च ऑपरेशन दरम्यान रत्नागिरी पोलिसांनी एक संशयित टँकर जप्त केला आहे. टँकर चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई पोलिसांना धमकीचा फोन
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक फोन आला होता. आरडीएक्स घेऊन एक टँकर गोव्याकडे निघालाय. तसेच, दोन पाकिस्तानी नागरिक देखील या टँकरमधून गोव्याच्या दिशेने जात असल्याने या व्यक्तीने सांगितले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव पांडे असल्याचं सांगितलं जात आहे. एक टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याचा फोन पांडे याने मुंबई कंट्रोलरुमकडे केला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली सुरु केल्या. गोवा पोलिसही अलर्ट मोडवर आले.
नाकाबंदी दरम्यान टँकर ताब्यात घेतला
फोन कॉल नंतर मुंबई पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधत सतर्कतेचा इशारा दिला. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एक टँकर ताब्यात घेतला. या टँकरमध्ये केमिकल भरले आहे. टँकर ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासासाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. टँकरमध्ये स्फोटक आरडीएक्स ठेवले होते की नाही, याचा तपास पोलिस करत आहेत.