आ. चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यांच्यावर हैद्राबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. जाधव यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये करोनाची लागण झाली होती. त्यावर स्थानिक रुग्णालयात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू त्यांना हैदराबाद मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान रक्तदाब कमी झाल्याने त्यांचे निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी निधन बद्दल शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version