। अलिबाग । प्रतिनिधी ।
डिझेल तस्करीचा गोरखधंदा चालविणार्या राजू पंडितसह गणेश कोळी पोलिसांच्या हिटलीस्टवर आहेत. हेच माफिया दळवींना निवडून आणण्यासाठी उघडपणे प्रचार करीत आहेत. त्यांचा धंदा अबाधित राखण्यासाठी ते दळवींना मदत करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील समुद्रात डिझेल तस्करीचा धंदा राजरोसपणे आमदार दळवी यांच्या कृपेने सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदार डिझेलमाफियांसोबत कनेक्शन असलेल्या दळवींना मतदान करतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राजू पंडित असे डिझेलमाफियाचे नाव आहे. हा मुंबईचा रहिवासी असून, अरबी समुद्रातील डिझेल तस्कर म्हणून ओळखला जातो. परदेशातून तसेच भारतीय जहाज मुंबईमध्ये येत असताना त्यांच्या कॅप्टन अथवा अन्य व्यक्तींशी हातमिळवणी करून कमी भावाने त्यांच्याकडून डिझेल घेऊन मासेमारी करणार्या बोटींना ते कमी दरात विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. यातून दिवसाला करोडो रुपयांची उलाढाल केली जाते. या बोटी मुंबई, रेवस, बोडणी, रेवदंडा, अलिबाग येथील आहेत. या बोटींना बाजारभावापेक्षा 30 ते 35 रुपयांपेक्षा कमी म्हणजे 65 रुपये किमतीने डिझेल विकला जातो. विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या कृपेने हे धंदे सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
राज किशोरदार पंडित तसेच राजू भाय या नावाने ओळखल्या जाणार्या राजू पंडित मुंबईत कुलाबा, ससुन डॉक येथे बेकायदेशीर डिझेलचा गोरखधंदा करीत होता. त्याचे उरणमधील मोरा येथील पार्टनर नितीन कोळी तसेच रिर्चड यांच्याबरोबरच हा धंदा सुरु होता. लहान मुलांच्या मदतीने डिझेल तस्करी करीत होते.
येलो गेट येथील तत्कालीन पोलीस अधिकारी रश्मी करंदीकर यांनी राजू पंडित व त्याच्याबरोबरच काम करणार्यांविरोधात कारवाई केली. मोक्का अंतर्गत, दहशतवादी, चाईल्ड अॅक्ट 120 बी नुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. राजू पंडित गेली अनेक वर्षे कारागृहात होता. तीन वर्षांनंतर त्याला जामीन मिळाला. रेवस मांडवा, बोडणी तसेच मोरा, उरण, करंजा या समुद्रकिनारी त्याला जाण्यास बंदी करण्यात आली होती. परंतु, हा धंदा सुरु ठेवण्यासाठी त्याने रायगड जिल्ह्याची निवड केली. डिझेल तस्करीमध्ये नवीन अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्याने आमदार महेंद्र दळवी आणि बोडणी येथील गणेश कोळी यांच्याशी हात मिळवणी केल्याचे समजते. पनवेल येथील म्हात्रे नामक या व्यक्तीमार्फत आमदार दळवींसोबत राजू पंडित याने ओळख निर्माण केली. टँकरमागे 60 हजार रुपये असे एकूण सुमारे 40 ते 50 लाख रुपयांची टक्केवारीतून धंदा चालू ठेवण्याची चर्चा आहे. आमदार दळवी यांच्या कृपेने डिझेल तस्करीचा धंदा चालू असल्याचे बोलले जाते. दरम्यान, रेवदंडा बंदरासह मांडवा अन्य बंदरांवर खुलेआमपणे हा धंदा केला जात असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दळवी यांचा प्रचार सुरु आहे. विकासाच्या बाता त्यांच्याकडून मारल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र बेकायदेशीर धंदा करणार्यांना पाठबळ देऊन आपली आमदारकी टिकून ठेवण्याचा डाव त्यांनी सुरु केल्याची चर्चा आहे. गुन्हेगारांसोबत हितसंबंध जपून सत्तेचा दुरुपयोग करून अनधिकृत धंद्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुन्हेगारांना हाताशी धरणार्या आ. दळवी यांना अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदार निवडून देतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली
राजू पंडित याच्याविरोधात डिझेल तस्करी, मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. डिझेल तस्करी रोखण्यासाठी राजू पंडित याला मुंबईत हा धंदा करण्यास न्यायालयाने बंदी घातली. मुंबईत डिझेल तस्करीला बंदी घातल्याने त्याने रायगड जिल्ह्याची निवड केली. अलिबाग, रेवदंडा, श्रीवर्धन परिसरात हा धंदा सुरू केला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता, डिझेल तस्करीचा धंदा रायगड जिल्ह्यात चालू ठेवला. त्याने न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत अरबी समुद्रात हा व्यवसाय सुरु ठेवल्याची माहिती समोर येत आहे.
राजू पंडित व कडीया यांच्यात वाद
उरणमधील मोरा येथील दिनेश गायकवाड उर्फ कडीया याच्याविरोधात मोरा पोलीस ठाण्यात डिझेल तस्करीची नोंद आहे. मूंबई बांद्रा कस्टमने डिझेलची बोट पकडली होती. रफिक आणि आयुब हे मुंबईमधील असून, राजू पंडितचे डिझेल तस्करीचे पार्टनर आहेत. त्यांनीसुद्धा अलिबाग, रायगड जिल्ह्यात धंदा चालू केला आहे. आयूब व रफिक यांच्याविरोधात येलो गेट पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ व डिझेल तस्करी केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीवर्धन समुद्रात मुंबई कस्टमने डिझेलने भरलेल्या त्यांच्या बोटी पकडल्या होत्या. राजू पंडित याच्या मदतीने काम करणार्या कडीया उर्फ दिनेश गायकवाड याने डिझेल तस्करीचा स्वतंत्र धंदा सुरु केला आहे. वेगळी टोळी निर्माण केली आहे. त्यामुळे दोघांमध्ये अंतर्गत वाद सुरु आहे.
राजू पंडितविरोधात दहशतवादी चाईल्ड अॅक्टनुसार गुन्हे
मुंबईमध्ये डीसीपी अंतर्गत सीआयडी गुन्हा रजि. नं. 65 /2015 अंतर्गत 379, 285,3.7.8 तसेच जीवनावश्यक कायदा 1955 प्रमाणे डिझेल तस्करीची नोंद करण्यात आली आहे. डीसीपी सीआयडी गुन्हा रजि. नं. 65/2016 अंतर्गत 387, 506, 285, 120 बी. मोक्का, दहशतवादी अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. यलो गेट पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 2/2018 आणि 224/2023 अंतर्गत 4, 21 या संदर्भात नोंद आहे. या गोरखधंद्यात गणेश कोळी याच्याविरोधातदेखील चार गुन्ह्यांची नोंद आहे. लाखो रुपयांची डिझेल तस्करी केल्याची नोंद मुंबई कस्टम, मांडवा सागरी, येलो गेट पोलीस ठाण्यात आहे.
शासनाचा महसूल बुडतो
रायगडमधील रेवदंडा पोलीस ठाणे, तरणखोप पोलीस ठाणे पेण यांच्या अंतर्गतसुद्धा डिझेल तसकरीच्या गुन्ह्याची नोंद आहे. सद्यःस्थितीत रायगडमध्ये या टोळीवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात डिझेल तसकरीच्या गुन्ह्याची नोंद आहे. तरी पण ही टोळी खुलेआम फिरत आहे. बेकायदेशीर डिझेलचा धंदा करीत असून, त्यांच्यावर कारवाई होऊनसुद्धा त्यांना अटक झालेली नाही. हे बेकायदेशीर डिझेल तस्कर समुद्रामध्ये व खाडीमध्ये मच्छिमार करणार्या मोठ्या बोटमालकांना कमी भावाने डिझेल देतात. त्यामुळे स्थानिक मच्छिमारी सोसायटीचे डिझेल कोणी घेत नसून, सोसायटी नुकसानात आहे व शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे, असे सांगण्यात आले.
डिझेल तस्करीविरोधात कोळी महासंघाची तक्रार
रायगड जिल्ह्यातील खाड्यांमध्ये बेकायदेशीर डिझेल तस्करीचा व्यवसाय चालत आहे. या धंद्यातील टोळीचा मुख्य सूत्रधार राजू पंडित आहे. खाडीजवळील बंदरावर व समुद्रात डिझेलचा काळाबाजार करीत आहे. दिवसाला करोडो रुपयांची उलाढाल करीत आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. राजू पंडितविरोधात ठाणे, मुंबई यलो गेट पोलीस ठाण्यात मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. डिझेल तस्करी करणार्या बोटींपासून खाडीत लावलेल्या व समुद्रात लावलेल्या जाळींचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी रायगड जिल्हा कोळी महासंघाकडून करण्यात आली होती. याबाबत जिल्हा अध्यक्ष टिवळेकर यांनी डीसीपी पोर्ट झोनला 18 जून 2024 रोजी निवेदन दिले आ