आमदार अपात्रता सुनावणी आज

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेना आमदार आपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष सोमवारीि दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला विलंब केल्याने सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना फटकारले होते. एका आठवड्यात सुनावणी घेऊ न दुसऱ्या आठवड्यात सुनावणी रूपरेखा आखू दोन आठवड्यात अहवाल सादर करायचे निर्देशही न्यालयाने दिले आहेत .त्यानुसार सुनावणीला सुरूवात होणार आहे. नार्वेकर यांनी नव्याने शिवसेनेच्या 54 आमदारांना नोटीस बजावल्या आहेत. अपात्रतेबाबत सर्व याचिका एकत्र करून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

गरज पडल्यास शिवसेनेच्या दोन्ही गटांचे म्हणजे शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावणीसाठी बोलवले जाऊ शकते. असे नार्वेकरांनी यापूर्वीच म्हटले आहे. शुक्रवारी नार्वेकरांनी विधानभवनातील विधी विभाग आणि वकिलांशी चर्चा केली होती. त्यानंतर अचानक दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दिल्लीला गेले. दिल्लीत त्यांनी कायदेतज्ज्ञांच्या भेटीगाठी घेतल्या.

Exit mobile version