तळीये दुर्घटनेतील जखमींची आमदार गोगावलेंनी घेतली भेट

| महाड | वार्ताहर |
तळीये दुर्घटनेतील उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी कोणाचा पाय, तर कोणाचा हात, कोणाची कंबर तसेच शरीरातील ईतर अवयव दरडी खाली अडकल्यामुळे निकामी झाले आहेत.

दुर्घटनाग्रस्त तळीये गावातील रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आमदार गोगावले यांनी वेळ नसताना देखील काल दि 6 जुलै 2021 रोजी तात्काळ के.ई.एम. आणि जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना जाऊन धीर दिला. दोन्ही रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याशी चर्चा केली आणि आपण रुग्णांकडे खास करून लक्ष द्यावे असे सांगितले.

Exit mobile version