आ. जयंत पाटील चषक बुद्धिबळ स्पर्धा

साई बलकवडे, ओम बलकवडे, प्रवर, श्रीकांत मानकरी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवस सोहळ्या निमित्त पी. एन पी.कॉलेज गोंधळपाडा, व रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना अलिबागचे वतीने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खुल्या गटात 42 स्पर्धक, 17 वर्षाखालील गटात 56 स्पर्धक तर 13 वर्षाखालील गटात 40 स्पर्धकांनी सहभाग घेवुन आमदार, शिक्षण सम्राट, सहकार, सामाजिक आणि बँकिग क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेणारे तसेच उद्योगपती जयंत पाटील यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. विलास म्हात्रे, रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना यांनी सर्व खेळाडू, हितचिंतक, पालक वर्ग आणि पी. एन.पी संस्थेचे सर्व कर्मचारी, आणि सेवकवर्ग, प्राचार्य यांचे वतीने भाईना वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या.

स्पर्धेचे उद्घाटन पी. एन.पी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील यांनी केले. यावेळी पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष विक्रांत वार्डे तसेच मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा साखळी पद्धतीने 6 फेर्‍यात घेण्यात आली होती. स्पर्धा पंच म्हणून, विलास म्हात्रे, सी.एन.पाटील, श्रेयस पाटील, अमित कदम, सुशील गुरव, आयुष अभाणी, प्रकाश पेंडणेकर, किशोर देशपांडे, राजेश्री घरत यांनी केले.


निकाल
खुला गट :- प्रथम क्रमांक साई दिपक बलकवडे अलिबाग, (अपराजित) 6/6 3500/- आणि ट्रॉफी,
द्वितीय क्रमांक राहुल तांबे, 5/6, अलिबाग, 2500/- आणि ट्रॉफी,
तृतीय क्रमांक विजय ठीक पनवेल,5/6, 1500/- अणि ट्रॉफी,
चतुर्थ क्रमांक सन्मिल गुरव ,अलिबाग, 4.5/6, 1000/- आणि ट्रॉफी , पाचवा क्रमांक, धीरज पाटील उरण, 4.5/ 6, रू.700/- आणि ट्रॉफी, उत्तेजनार्थ बक्षीस, पुर्वा पेंडनेकर अलिबाग, मानसी रमाकांत म्हात्रे,अलिबाग, आणि दिलीप पाटील , मुरुड यांना देण्यात आली.

सतरा वर्षांखालील ग्रुप
प्रथम क्रमांक, ओम दिपक बलकवडे,अलिबाग, (अपराजित) 5.5/6, रू.2000/- आणि ट्रॉफी,
द्वितीय क्रमांक मयुरेश म्हसे,खालापूर, (अपराजित) 5.5/6, रू. 1500/- आणि ट्रॉफी,
तृतीय क्रमांक आरव गोस्वामी,5/6, खारघर 1000/- आणि ट्रॉफी, चतुर्थ क्रमांक, अद्वय प्रसाद , खारघर, 5/6,रू. 700/- आणि ट्रॉफी, पाचवा क्रमांक,हिमांशू डंगर ,अलिबाग,5/6 ,रू. 500 आणि ट्रॉफी, तर उत्तेजनार्थ बक्षीस, श्रावणी वाठोरे, गोरेगाव,4/6, वेदांती मयेकर ,अलिबाग 4/6, आणि निधी गुडदे 4/6 यांना बक्षिसे देण्यात आली.

तेरा वर्षा खालील ग्रुप
प्रथम क्रमांक ,प्रवर श्रीकांत, खारघर,5/6 , रू. 1500/- आणि ट्रॉफी,
द्वितीय क्रमांक,अपेक्षा मरभल,अलिबाग ,5/6, रू. 1000/- आणि ट्रॉफी ,
तृतीय क्रमांक, कौस्तुभ भगत, अलिबाग अलिबाग,5/6,रू. 700/- आणि ट्रॉफी, चतुर्थ क्रमांक , अथर्व राजेंद्र वाघ, अलिबाग, 4.5 /6 रू.500/- आणि ट्रॉफी, पाचवा क्रमांक, आरव राज, खारघर, 4.5/6 रू. 300/- आणि ट्रॉफी. तर उतेजनार्थ सन्वी म्हात्रे, ईश्‍वरी वर्तक , अलिबाग, आणि भाविन पूनमिया, पेण यांना देण्यात आली.

पी. एन.पि. एज्युकेशन ससायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी स्पर्धा चे आयोजन सुंदर केल्याचे कौतुक केले आणि अशी स्पर्धा दरवर्षी घेतली जाईल असे जाहीर केले. बक्षिस समारंभ वेळी रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे, पि. एन.पि. एज्युकेशन सोसायटीचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री संजय मिर्जी, प्राचार्य, डॉ. ओमकार पोटे, पि.एन.पि एज्युकेशन सोसायटी चे क्रीडा शिक्षक तेजस म्हात्रे, प्रा. दिनेश पाटील, प्रा. रवींद्र पाटील यांनी बक्षिस वितरण केले. राजेश्री घरत यांनी सहकार्या बद्दल सर्वांचे आभार मानून स्पर्धेची सांगता केली.

Exit mobile version