| पेण | प्रतिनिधी |
पेण नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यामध्ये माजी राज्यमंत्री, आ. रविशेठ पाटील यांची सुन माजी उपनगराध्यक्षा अरुणा पाटील व पुतण्या माजी बांधकाम सभापती सुहास पाटील यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करून आपल्याच कुटुंबाविरुध्द रणशिंग फुंकसे आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश सोहळा गांधी वाचनालय सभामंडपात संपन्न झाला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, विलास पोतनीस, विष्णूभाई पाटील, सुरेंद्र म्हात्रे, संजय चिटणीस, तालुका प्रमुख जगदीश ठाकुर, नरेश गावंड, अविनाश म्हात्रे, प्रदीप वर्तक, अच्युत पाटील, राजा पाटील, लहू पाटील, शिवाजी विजय पाटील, व महिला जिल्हा संघटीका दिपश्री पोटफोडे, मेघना चव्हाण, दर्शना जवके उपजिल्हा संघटीका, राजेश्री घरत, महानंदा तांडेल, ज्योत्स्ना शिंदे, नलिनी ठाकूर, वैशाली बाम्हणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका भावना बांधणकर, नगरसेवक कृष्णा भोईर, मा. नगरसेवक मनोज नाझरे, यांच्यासह सुनीता म्हात्रे, जीवन पाटील, सुजाता समेळ, शादाब असदअली अखवारे, छाया काईनकर, निलम सावंत, मयुरेश चाचड, कल्पना भोईर, विजय केळकर, कमलाकर पाटील, संकेत म्हात्रे, राजू आंग्रे, ना.कृ.म्हात्रे, दिनकर म्हात्रे, मिया खान, मोईज काचवाला, अयुब खान, मोहसीन तांडेल, नसीम खान, राकेश पाटील, नसीमा खोज, सुभाष वडके, अलिना सय्यद, कल्पना भोईर, सुनील भोईर, शैलेश देशपांडे अदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो व भाजप मधील कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पेण येथील पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम नाही तर तो विजय उत्सवाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे काही प्रस्थापितांची झोप उडाली असेल. येथील आमदारांना आज झोप लागणार नाही. शिवसेनेच्या मदतीशिवाय यांना आमदार होणे शक्य नव्हते. दमदाटीला आणि दादागिरीला शिवसेना घाबरत नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी तालुका अध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी आपल्या मनोगतात नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा आत्मविश्वास दाखवला तर प्रवेशकर्ते प्रदिप मोने यांनी आपल्या मनोगतात सर्व ताकदीने शिवसेनेत राहु, असे अभिवचन दिले. संजय चिटणीस यांची जीभ घसरली, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केली. विष्णू पाटील देखील नगरपालिकेवर भगवा फडकवणारच. पेण विधानसभेचा आमदार शिवसेनेचा असेल असे वक्तव्य केले. जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आज खरा पक्षप्रवेश झाला असून पंजा आपल्या हातात आहे असे सांगितले, तर आ. विलास पोतनीस यांनी रायगडच्या गद्दार आमदारांना जागा दाखवली जाईल असे सांगून पेणमध्ये दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. दादागिरी केल्यास गाठ शिवसेनेशी आहे, असे आपल्या मनोगतात सांगितले.