| महाड | प्रतिनिधी |
सोलमकोंड येथे एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजण्या पूर्वी ही घटना घडली. मोबाईलवर स्टेटस ठेवून त्याने ही आत्महत्या केली. या घटनेची नोंद महाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव सतीश भरत पवार असे आहे. तो मूळचा धामणे ता. महाड येथील रहिवासी आहे. सध्या तो सोलमकोंड येथे एका चाळीमध्ये राहत होता. एकतर्फी प्रेमातून त्याने या चाळीमध्ये पत्र्याच्या शेडला नायलॉन दोरी बांधून गळफास लावला आणि दारूच्या नशेत आत्महत्या केली. या प्रकरणी भाऊ आदेश पवार याने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.