। मुंबई । वृत्तसंस्था ।
3 मार्चपासून विधिमंडळांच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र आमदारांच्या वार्षिक निधी वाढीच्या निर्णयाने ते खूश आहेत. वित्तमंत्री अजित पवार यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पात आमदार निधि 4 कोटींवरून 5 कोटी करण्याची घोषणा केलीय. त्याचबरोबर आमदारांचे स्वीय सहाय्यक आणि ड्रायव्हर यांच्या पगारातही वाढ करण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवारांनी ही घोषणा करताच सर्वपक्षीय सदस्यांनी या निर्णयाचं बाक वाजवून स्वागत केलं.
मार्च 2020 मध्ये हा निधी 2 कोटींवरुन 3 कोटी करण्यात आला आणि त्यानंतर हा निधी 4 कोटींपर्यंत वाढवण्यात आला. यंदा तो 5 कोटींपर्यंत वाढवण्यात आल्याने सर्वपक्षीय आमदार महाविकास आघाडी सरकारवर खूश आहेत. या निर्णयामुळे आमदार खुश असले तरी सरकारी तिजोरीवर सुमारे 400 कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राज्यावर सुमारे 6.49 लाख रुपयां कर्ज असताना ,अचानक आमदार निधित केलेल्या वाढीला अनेक वरिष्ठ सनदी अधिकार्यांनी आक्षेप घेतलाय. कोरोना महामारीमुळे राज्य मोठ्या अडचणीत असताना आमदार निधी वाढवण कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.