समुद्रकिनार्‍याची ‘मनसे’ स्वच्छता

| आगरदांडा | प्रतिनिधी |

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याच्या प्रयत्नात राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेतर्फे 11 डिसेंबर रोजी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. ही मोहीम महाराष्ट्राला लाभलेल्या सहा जिल्ह्यांतील सुमारे 720 कि.मी. लांबीच्या किनारपट्टीवरील 40 पेक्षा अधिक समुद्रकिनार्‍यांवर एकत्रितपणे आयोजित करण्यात आली होती.

पर्यावरण संवर्धन आणि शाश्‍वत विकासासोबत विविध पर्यावरणपूरक उद्योग आणि धंदे स्थानिकांसाठी नवीन रोजगार उपलब्ध करू शकतात म्हणूनच सर्व समुद्रकिनार्‍यांवर स्थानिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांसाठी कार्यशाळा आयोजित करून प्रत्येक महिन्याला स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या सर्व समुद्रकिनार्‍यांना स्वच्छ, सुशोभित आणि सुरक्षित बनवता येईल असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेने तर्फे गतवर्षीप्रमाणे समुद्र मंथन 2.0 ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. सकाळीच मुरुड समुद्र किनारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. यामध्ये मुरुड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थीसुद्धा मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या सर्वानी मिळून मुरुड समुद्र किनारा स्वच्छ करण्यास महत्वाचे योगदान दिले. सुमारे अडीच किलोमीटरचा समूह किनारा येथे जमा झालेल्या कचरा एकत्र करून तो मुरुड नगरपरिषदेच्या स्वछता गाडीत टाकण्यात आला. यासाठी नगरपरिषदेने एक ट्रॅक्टर व स्वच्छता कर्मचारी सुद्धा देण्यात आले होते.

या स्वच्छता मोहिमेसाठी मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रायगड विभाग शैलेश खोत, रायगड जिल्हाध्यक्ष पर्यावरण सेनेचे अभिजित घरत, तालुका अध्यक्ष मुरुड पद्मदुर्ग महेंद्र शेडगे, शहर अध्यक्ष जागन पुलेकर, तालुका उपाध्यक्ष मनविसे प्रवेश पुलेकर, तालुका उपाध्यक्ष पर्यावरण सेना सिद्धार्थ कोलंबेकर, महाराष्ट्र सैनिक-मनीष शामा, सूरज जयस्वाल, प्रज्ञेश कारभारी, प्रतिम भायदे आणि वसंतराव नाईक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version