पहूर गाव झाले स्वच्छ आणि सुंदर
शिवज्योत प्रतिष्ठान, शिवकन्या गु्रपचा पुढाकार
। कोलाड । वार्ताहर ।
8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पहूर येथे ग्रामस्वच्छता अभियान मोहीम पार पाडून हा दिवस महिलादिनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
शिवज्योत प्रतिष्ठान पहूर व शिवकन्या ग्रुप पहूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ व सुंदर माझे गाव, स्वच्छतेकडून समृद्धीकडे या शीर्षकाखाली ग्रामस्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत मंडळाचे सर्व सदस्य, गावातील महिला यांनी विशेष सहभाग नोंदवून स्वच्छता अभियानाचे महत्त्व समजावून सांगितले.
मंडळाच्या या उपक्रमाचा आपले गाव स्वच्छ राहावे, सुंदर दिसावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. सर्वांनी सहभाग घेऊन ही स्वच्छता मोहीम यशस्वी केली. त्याबद्दल सर्वांकडून शिवज्योत प्रतिष्ठान व शिवकन्या ग्रुप पहूर यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. या मोहिमेला गावचे पोलीस पाटील रमेश धनावडे, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत धनावडे व ग्रामपंचायत सदस्य तेजस काळोखे यांनी अल्पोपाहार देऊन व अन्य बाबतीत सहकार्य करून हे अभियान यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आले.