| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील विविध रस्त्यावर पावसामुळे पडलेले खड्डे भरून काढावेत या मागणीसाठी महारष्ट्र नवनिर्माण सेनेने नेरळ ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन मागणी केली आहे. सरपंच उषा पारधी यांनी निवेदन स्वीकारून सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. नेरळ पाडा रेल्वे गेट ते नेरळ साई मंदिरमधील मातोश्री नगर येथील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे निवेदन दिले. यावेळी तालुका तालुका उपाध्यक्ष मिलिंद मिसाळ, मनसे नेरळ अध्यक्ष हेमंत चव्हाण, नेरळ मातोश्री नगर विभाग अध्यक्ष ओंकार आदी उपस्थित होते.