| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी आज पेण रायगड येथील पेण गड अलिबाग गड असे नावाचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले . अमित ठाकरे हे त्यांच्या रायगड दौऱ्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मन सैनिकामध्ये नवं चैतन्य निर्माण झाले होते.आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने अमित ठाकरे हे रायगडात येत असल्याने मनसे ची निवडणुकीची पुढची रणनीतीही केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल, पेण व अलिबाग गड जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन अमित ठाकरे व आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.