। महाड । वार्ताहर ।
नुकताच राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेत बदल केला आणि महानगरपालिका नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी नव्याने प्रभाग रचना केली यामध्ये मुंबई वगळता सर्वत्र बहूसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याचा प्रखर शब्दात विरोध केला आहे. यालाच अनुसरून महाड तालुक्यातील मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडच्या तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी पंकज उमासरे, लक्ष्मण कंक, दीपक चव्हाण, बंटी पाटील, अतुल चित्रे, महाड शहर संघटक प्रदीप दळवी, चित्रपट सेना तालुका अध्यक्ष चंद्रहास नगरकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.