मनसेतर्फे उरण महोत्सवाचे आयोजन

| उरण | वार्ताहर |
27 ते 29 मे रोजी उरण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.बोकडविरा येथील सिडकोच्या मैदानात होणार्‍या या महोत्सवात विविध प्रकारच्या स्टॉल्स ची रेलचेल असणार आहे.बोकडविरा येथील सिडकोच्या मैदानात होणार्‍या या महोत्सवात विविध प्रकारच्या स्टॉल्स ची रेलचेल असणार आहे.या महोत्सवात पाककला स्पर्धा,विविध मसाल्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिला बचत गटांनी बनविलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी म्हणून त्यांना मोफत स्टॉल देण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी मनसेच्या विविध नेत्यां बरोबरच मराठी सिने सृष्टीतील अनेक कलावंत हजेरी लावणार असल्याने ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.
या पत्रकार परिषदेसाठी मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसे रोजगार स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष महेंद्र बैसाने,यांच्यासह ज्येष्ठ नेते सत्यवान भगत,सिद्दी आंगणे,रितेश पाटील,राकेश भोईर,संगीता ढेरे,अल्पेश कडू,,प्रणव कारखानीस आदी उपस्थित होते.

Exit mobile version